Posts

Showing posts from March, 2020

Lockdown 8th Day

आज 1450 कोरोनाबाधित रुग्ण आहेत,दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत आहे.पुढे होणाऱ्या आर्थिक मंदीमुळे भयानक परिणामांना तोंड द्यावे लागेल.

भारत बंद

Image
आज         काल दि.२४/०३/२० २० रोजी भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा पूर्णतः बंदोबस्त करण्यासाठी संपूर्ण भारत बंद ची घोषणा केली .तिसर्या आठवड्यात भारतात कोरोनाचे ५५० रुग्ण आहेत.काही रोगी कोरोनामुक्त होत आहेत.मृत्यूचे प्रमाण फारच कमी आहे.अन्य देशांच्या तुलनेत भारत चांगल्या स्थितीत आहे .हा कर्फ्यू २१ दिवसांसाठी म्हणजेच १४ एप्रिल पर्यंत आहे .पुढील ३ आठवड्यात नक्कीच आपण कोरोनावर पूर्णतः मात केलेली असेल.         सर्वाना घरीच राहावे लागत आहे.पेट्रोल पंप बंद आहेत .बाहेर  पडायला कुणालाच मार्ग नाही .एरव्ही धावपळीतील जीवन स्थिरावले आहे .कुटुंबात सारेच रमले आहेत.सर्व कामातून मुक्तता मिळाली आहे . पोलीस  विनाकारण बाहेर  फिरणार्यांना लाठीचा चोप देत आहेत.अनेक लग्न समारंभ ,धार्मिक कार्यक्रम रद्द झालेले आहेत.एखाद्याचा अंत्यसंस्कार सुद्धा २० लोकांनी करायचा आहे.महायुद्धात सुद्धा अशी स्थिती आली नाही ती   आज आहे.सर्व काही ठप्प झाले आहे.परस्परांचा फक्त फोनवर संपर्क आहे.ग्रामीण भागात मात्र लोकांना काहीच बंधने जाणवत नाहीत. ...

Lockdown

Image
        आज घडीला संपूर्ण भारतामध्ये कोरोनाचे 480 पेशंट्स identified झालेले आहेत.संपूर्ण राज्य बाधित झालेले आहेत.महाराष्ट्रात सर्वाधिक80 रुग्ण आहेत.अशा परिस्थितीत Lockdown हा पर्याय सरकारपुढे उरला आहे.संपूर्ण देशात ही आणीबाणी लागू झालेली आहे.जीवनावश्यक गोष्टी जसे दवाखाने,किराणा दुकाने, भाजीदुकाने सुरु आहेत.सर्व लोकांना आणखी 15 दिवस घरातच सुरक्षित थांबणे आहे.शाळांना सुट्ट्या आहेत.जर लोकांनी सरकारचे ऐकले नाही तर इटली,अमेरिका यासारखी परिस्थिती होऊ शकते.ती वेळ येऊ नये म्हणून कर्फूचा  अंतिम पर्याय सरकारला वापरावा लागेल.            सध्या भारत साथ संक्रमणाच्या दुसर्या टप्प्याअखेर आहे ,तिसरा टप्पा भयानक आहे.ती अवस्था आली तर तोकड्या वैध्यकीय व्यवस्थेपुढे भारताची काय दयनीय अवस्था होईल याची कल्पना न केलेलीच बरी.   महाराष्ट्र बंद

जनता कर्फ्यू

Image
                         दि.22 मार्च 2020,रविवारला संपूर्ण जगात हाहाकार निर्माण करणाऱ्या कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फुचे आवाहन केले होते,लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला.भारतीय लोक परिपक्व मानसिकतेचा परिचय देत आहेत.आम्ही सर्वजण आजचा दिवस आनंदाने घरीच घालवला.सायं.5.00 वा. सर्व लोकांनी टाळया वाजवून मानवतेची सेवा देणाऱ्या डॉक्टर ,परिचारिका, पोलीस ,अधिकारी,स्वयंसेवक,सर्व राष्ट्रसेवक आणि राष्ट्ररक्षक यांना अभिवादन करण्यात आले. .हा प्रसंग अविस्मरणिय होता.                         मात्र काही उत्साही लोक social distancing पळताना दिसत नाहीत .त्यामुळे मूळ उद्देश्याला हरताळ फासला जात आहे. आयुष्यातील हा पहिला प्रसंग आहे.सर्वत्र शुकसूकाट .राज्यभर lockdown.फक्त अत्यावश्यक सेवा सुरू आहेत.कोरोना virus ने एक नवाच अनुभव दिला.   प्रधानमंत्री का आदेश                       ...